महालोकअदालतीत 24 हजार दावे निकाली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - न्यायालयात दावे दाखल न करताच जिल्ह्यातील २१ हजार ६६० पक्षकारांना न्याय मिळाला आहे. दावे दाखल होण्यापूर्वीच रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये ते निकाली काढण्यात आले. तसेच, प्रलंबित २ हजार ९५० खटले निकाली काढले आहेत. दोन्ही मिळून जिल्ह्यातील २४ हजार ६१० दावे निकाली काढण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. आर. अष्टुरकर यांनी दिली. या दाव्यामध्ये तब्बल १९ कोटी ९३ लाख २२ हजार ४१६ रुपयांची तडजोड करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यातील न्यायालयात महालोकअदालतचे आयोजन केले होते. यात दाखलपूर्व दावे निकाली काढण्यावर भर देण्यात आला होता. ५६ हजार २३७ दाखलपूर्व दावे तडजोडीसाठी ठेवले होते. त्यापैकी २१ हजार ६६० दाव्यांमध्ये तडजोड होऊन ७ कोटी ७ लाख ३७ हजार ५०० रुपयांची तडजोड करण्यात आली आहे. दाखलपूर्वमध्ये धनादेश न वटणे, बॅंक, वीज, पाणी बिलसंबंधी, वैवाहिक, तडजोड योग्य दिवाणी, फौजदारी दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. तसेच १९ हजार ५४४ प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवले होते. त्यापैकी २ हजार ९५० दावे निकाली काढले आहेत. त्यामध्ये १२ कोटी ८५ लाख ५६ हजार १८० रुपये रकमेची तडजोड केली आहे. 

धनादेश न वटणे, बॅंक, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, वीज, पाणी, वैवाहिक, जमिनीसंबंधी वाद, महसूल, विविध सेवा आणि तडजोड योग्य फौजदारी, दिवाणी स्वरूपाचे प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवले होते.

Web Title: mahalokadalat court 24000 cases result