पालखी सोहळा मोबाईल अॅप सुरू

मनोज आवाळे
बुधवार, 14 जून 2017

दोन दिवसात एक हजार भाविकांनी केेेले डाऊनलोड

हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करा - https://goo.gl/IDEDAA

पुणे : पंढरपूर आषाढी वारीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वतंत्र मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करण्यास सुरवात झाली आहे. पालखी सोहळा,२०१७ असे अॅपचे नाव असून त्यावर पंढरपूर मंदिरातील विठ्ठलमुर्ती आणि रखुमाई मूर्तींचे लाइव्ह दर्शन करता येणार आहे.

पालखी मार्ग, पालखी-दिंडी प्रमुखांचे मोबाइल क्रमांक, आरोग्यकेंद्र, स्वस्त अन्नधान्य वितरण केंद्रे, ग्रामसेवक, सरपंचांचे क्रमांक, हरवलेल्या व्यक्तींसाठी मदतकेंद्र, पाणी टँकर, रॉकेल सिलिंडर वितरकांचे नावे अशा सुविधा असणार आहेत. १२ जूनपासून एण्ड्रॉईड आणि एप्पल ऑपरेटींग सिस्टमवर आधारित गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. गेल्या दोन दिवसात एक हजार भाविकांनी एप डाऊनलोड केेले आहे. 

खालील लिंकवरुन हे एप डाऊनलोड करता येऊ शकणार आहे. पालखी सोहळा 2017 करता वारकरी व नागरिक यांना एका क्लिकवर आवश्यक ती सर्व माहिती व संपर्क उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी सदरचे अॅप तयार केलेले असून, हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करा - https://goo.gl/IDEDAA