भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - भगवान महावीर यांची जयंती शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर, अन्नदान व वृक्षारोपण आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच मिरवणुकांचेही आयोजन करण्यात आले होते. 

श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन महापालिका शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांच्या हस्ते झाले. या वेळी 225 जणांनी रक्तदान केले. नगरसेवक वनराज आंदेकर, हेमंत रासने, विशाल धकनवडे, नरेंद्र जैन, हरेश कावेडिया, राजेश ओसवाल उपस्थित होते. 

श्री सत्तावीस जैन सिटी ग्रुपतर्फे भवानी पेठेतील हमाल पंचायतीशेजारी पाणपोईचे उद्‌घाटन नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्या हस्ते झाले. ग्रुपचे अध्यक्ष सोहनराज सिरोहिया, मांगीलाल सिरोहिया, भरत सोळंकी, वस्तीमल सोळंकी उपस्थित होते. राजस्थानी श्वेतांबर ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 115 जणांनी रक्तदान केले. सामाजिक न्याय व राज्यमंत्री दिलीप कांबळे, कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, मनीषा सोनाग्रा, सुरेश ओसवाल उपस्थित होते. शांतिनाथ जैन मंदिर ट्रस्टतर्फे अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टमधील कर्णबधिर मुलांना अन्नदान करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष मनोज छाजेड, उमेश शिंगवी, सुनील रांका, मनीष भंडारी, गिरीश शहा उपस्थित होते. 

भगवान महावीर उत्सव समितीतर्फे भवानी पेठ ते भोपळे चौकादरम्यान मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक विनोद मथुरावाला, रवींद्र धंगेकर, माणिक भंडारी, डॉ. रमेश संचेती, राजेश फुलफगर उपस्थित होते. कॅम्प ज्वेलर्स ग्रुपतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. अशोक ओसवाल, बाबूलाल कांकरिया, सुरेश ओसवाल, भरत कोठारी उपस्थित होते. महावीर फूड बॅंक व जय आनंद ग्रुपतर्फे तीन हजार पाचशे किलो धान्य संकलित करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष पृथ्वीराज धोका, बॅंकेचे अध्यक्ष विजय मर्लेचा, अशोक लेले, राजेंद्र सुराणा, राम तोरकडी उपस्थित होते. 

भारतीय अल्पसंख्याक संघटनेतर्फे महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ताहेर आसी, फोजीया रोकडे, समद आसी, युसूफ बागवान, एम. रशीद खान, आरिफ पानसरे उपस्थित होते. 

Web Title: mahaveer jayanti celebration

टॅग्स