‘फॅमिली कट्टा’, ‘भो भो’ सर्वोत्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पुणे - मराठी चित्रपट परिवारातर्फे आयोजित सातव्या मराठी चित्रपदार्पण पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मान ‘फॅमिली कट्टा’ व ‘भो भो’ या चित्रपटांनी पटकावला. तसेच विविध विभागांमधील पुरस्कारही त्यांनी मिळविले. ‘रंगा पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसाद नामजोशी यांना, तर ‘भो भो’ चित्रपटासाठी भारत गायकवाड यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

मराठी चित्रपट परिवार व आदित्य प्रॉडक्‍शनतर्फे एस. एम. जोशी सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ‘फिल्म सिटी’चे माजी संचालक लक्ष्मीकांत देशमुख, सांस्कृतिक खात्याचे सल्लागार व निर्माते मिलिंद लेले, ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे, गीतकार वैभव जोशी, निर्माते आदित्य दाढे, ज्येष्ठ अभिनेते सदानंद चांदेकर, अभिनेत्री पूजा पवार, अभिनेते विजय पटवर्धन, श्रीकांत यादव, प्रशांत तपस्वी उपस्थित होते.

‘वाय झेड’ चित्रपटातील भूमिकांसाठी अक्षय टंकसाळे व सागर देशमुख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर गौरी नलावडे (फ्रेंड्‌स) व समिधा गुरू (कापूस कोंड्याची गोष्ट) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला. उत्कृष्ट गीतकार व संगीतकाराचा पुरस्कार डॉ. नेहा राजपाल (फोटोकॉपी) यांना देण्यात आला. ‘उत्कृष्ट संवाद लेखन’ श्‍वेता पेंडसे (कौल मनाचा) यांना, तर प्रवीण वानखेडे (कापूस कोंड्याची गोष्ट) यांना ‘उत्कृष्ट कार्यकारी निर्माता’चा पुरस्कार मिळाला. अल्बम विभागाचा पुरस्कार ‘भिजलेली तू’ या अल्बमने मिळविला. याच अल्बमसाठी वैभव लोंढे यांना गायनासाठीचा पुरस्कार मिळाला. पत्रकार अभिजित थिटे यांना ‘रंग अबोली’साठी, मंदार चोळकर यांना ‘तुझ्या विना’ या अल्बमच्या गीतलेखनाचा, तर ‘तुझ्या विना’ अल्बमसाठी प्रसाद फाटक यांना संगीतकाराचे पुरस्कार प्रदान करण्यात आला. बंगाली गायिका अन्वेषा या उत्कृष्ट गायक ठरल्या. संगीतकार केदार भागवत यांनी सादरीकरण केले, तर सूत्रसंचालन कीर्ती रामदासी यांनी केले.

Web Title: marathi chitrapradarshan award