मराठीचे महत्त्व कमी झाल्याचे मूल्यमापन चुकीचे - डॉ. मोरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

पुणे - 'मराठी भाषेला "हा दर्जा मिळाला नाही' किंवा "तो पुरस्कार मिळाला नाही' म्हणून मराठीचे महत्त्व कमी होत नाही. खरे तर तसे निकष समोर ठेवून मराठीचे महत्त्व कमी झाले, असे मूल्यमापन करणे हेच मुळात चुकीचे आहे,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केले.

आचार्य अत्रे सभागृह येथे "डायमंड पब्लिकेशन'च्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी वाचकांशी संवाद साधला. या वेळी प्रकाशक दत्तात्रेय पाष्टे उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, 'नवनवी माध्यमे आपल्यासमोर येत आहेत. त्यामुळे छापील पुस्तकांवर सावट पसरले आहे, असे म्हटले जाते. त्यात काही अंशी तथ्य आहे; पण चांगली पुस्तके लिहिली गेली तर ती नक्कीच वाचली जातात. अशी पुस्तके आणि त्यांचे लेखक वाचकांच्या मनात घर करून राहतात. शेवटी अशी भावना वाचकांच्या मनात निर्माण करतो, तोच खरा लेखक असतो. चांगला लेखक होण्यासाठी आधी इतर लेखकांचे खूप वाचले पाहिजे.''

या प्रदर्शनात अनेक प्रकाशकांच्या, विविध विषयांवरील हजारो पुस्तकांचा समावेश आहे. प्रदर्शन 12 मार्चपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या दरम्यान खुले राहणार आहे.

Web Title: Marathi incorrect assessment of the importance