चारचाकीतून चौदा देशांचा प्रवास

चारचाकीतून चौदा देशांचा प्रवास

पुणे -‘पर्यटन आणि ड्राइव्ह’ करण्याची आवड असलेल्या व्यक्ती ध्येयवेड्याच असतात. जगभरात फिरण्याची कल्पना काही जण करतात. मात्र, त्या कल्पनेला सत्यात उतरविले आहे चारू श्रोत्री या चोपन्न वर्षांच्या व्यक्तीने! चारू यांनी चारचाकी वाहनाने भारत ते जपान (हॅम्बर्ग) असे चौदा देश फिरून एक आगळावेगळा विक्रम केला आहे. प्रवासादरम्यान आलेल्या अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी प्रवास पूर्ण केला. 

या प्रवासादरम्यान चारू यांच्यासोबत मेधा जोसेफ, सुजल पटवर्धन आणि इतर पाच सहकारी होते. चारू यांनी भारतातील इंफाळ येथून प्रवासाला सुरवात करून म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, फिनलॅंड, लॅटविया, लिथुआनिया, कालिनिनग्राड, पोलंड, जर्मनी असा चौदा देशांचा प्रवास २१ हजार ६४४ किलोमीटरचे अंतर कापत ६७ दिवसांत पूर्ण केला. फिनलॅंड या देशातील प्रवास त्यांनी बोटीने पूर्ण केला.

‘‘सुरवातीला अतिशय सोपा वाटणारा प्रवास पुढे रोमांचकारी आणि आव्हानात्मक ठरला. जगभरात प्रवास करताना अनेक ठिकाणचे वेगळेपण पाहावयास मिळाले. विविध शहरांतील ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करता आला. भारतीय नागरिक असल्याने चीनमध्ये पोलिसांनी थोडा त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही देशाची सीमा ओलांडताना अडचण आली नाही. उझबेकिस्तानमधील सुरक्षा अधिक कडक असल्याचे जाणवले,’’ असे चारू यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com