शिवाजी महाराजांचे विचार अंगी बाणवावेत - प्रा. गजानन वाव्हळ

Shivayan.
Shivayan.

जुनी सांगवी : 'छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईस आऊसाहेब म्हणत तर वडील शहाजीराजे यांना आबासाहेब म्हणत, मात्र आजची पिढी आईला मम्मी व वडीलांना पप्पा असे संबोधते. त्या काळी पिझ्झा, बर्गर असे पदार्थ नव्हते. फास्ट फुड खाऊन लढाया जिंकल्या जात नाहीत. म्हणुन मातांनी स्वत:च्या बालकांना योग्य आहार दिला पाहिजे. आजची पिढी या फास्टफुडच्या जाळ्यात ओढली जात आहे. शिवरायांचे बालपण प्रत्येक बालकांनी व्यक्तिगत जिवनात आचरणात आणून जिवनाचा सदुपयोग केला पाहिजे.' असे जुनी सांगवी येथे शिवविचार जागर अभियान व कै. सौ. शकुंतलाबाई शितोळे नुतन माध्यमिक विद्यालयात तीन दिवसीय संगीत बाल शिवायण या शिवचरीत्रातील घटनांवर आधारित गाथानाट्यातुन प्रवक्ते प्रा. गजानन वाव्हळ यांनी सादर करताना सांगितले. 

यावेळी प्रा. गजानन वाव्हळ व बालसहका-यांनी शिवचरित्रातील घटना व प्रसंगाचे नाट्याद्वारे सादरीकरण केले. त्यांनी आपल्या खास, ओघवत्या शैलीतुन शिवचरीत्रातील घटनाक्रमांची ओळख विद्यार्थ्यांसमोर नाट्याद्वारे सादर केली. प्रत्येक आईने स्वतःच्या मुलावर शिवचरित्राचे संस्कार करावेत असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तीन दिवसीय या संगीत बालशिवायण गाथानाट्याचे उद्घाटन माजी स्थायी अध्यक्ष श्री. प्रशांत शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सतिश साठे देशमुख, रामभाऊ खोडदे, परशुराम मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमासाठी भाऊसाहेब दातीर, सुनिता टेकवडे, हेमलता नवले, मनिषा लाड, शितल शितोळे व सहका-यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com