चाकण बाजारात कांद्याला प्रतिकिलो 16 रुपये भाव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

सध्या वखारी, छपऱ्यात साठविलेल्या कांद्याची आवक होत आहे. आवक घटल्याने कांद्याचे भाव वाढत आहेत. हे भाव वीस रुपयांना पार करून पुढे जातील असा अंदाज व्यापारी, शेतकरी यांनी वर्तविला आहे.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याला आज (शनिवारी) प्रतिकिलोला सोळा रुपये भाव मिळाला. कांद्याचे भाव गेल्या आठवड्यापासून चांगलेच कडाडत आहेत.

कांद्याला अजून भाव मिळण्याची शक्‍यता शेतकरी, व्यापारी यांनी व्यक्त केली. कांद्याची आवक साडेचारशे क्विंटल झाली, तर कांद्याला किलोला किमान दहा ते कमाल सोळा रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी दिली. 

सध्या वखारी, छपऱ्यात साठविलेल्या कांद्याची आवक होत आहे. आवक घटल्याने कांद्याचे भाव वाढत आहेत. हे भाव वीस रुपयांना पार करून पुढे जातील असा अंदाज व्यापारी, शेतकरी यांनी वर्तविला आहे.

रब्बी हंगामात काढणी केलेल्या कांद्याला प्रतिकिलोला अगदी तीन ते पाच, सहा रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नव्हता. मार्च ते मे महिन्यापर्यंत कांद्याची मोठी आवक राहिली. त्यावेळेस भाव गडगडले. पण आता आवक कमी झाल्याने भाव वाढत आहेत. किरकोळ बाजारात कांदा वीस रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.