काँग्रेस सरकारच्या योजना नाव बदलून जनतेसमोर : शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

हडपसर : ''देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच जाहीर केलेली सौभाग्य योजना ही देशाच्या सर्वसामान्य जनतेचे दुर्भाग्य आहे. काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजना फक्त नावे बदलून जनतेसमोर आणल्या जात आहेत,'' असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 

हडपसर येथे खासगी भेटीसाठी आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ते बोलत होते. 

या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचे पुष्पहार घालून स्वागत स्वागत केले. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण शर्मा, शहर चिटणीस प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, स्वप्नील धर्मे, नितीन गावडे, गणेश जगताप, हरीश शेलार, राजेश म्हामुनकर आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात देशाच्या विकासाचा दर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तुलनेत भारतात पेट्रोल व डिझेलचे दर चढेच आहेत. सरकार पेट्रोलियम कंपन्यांच्या आडून नफेखोरी करत आहेत. जाणीवपूर्वक पेट्रोलियमला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. सर्वत्र बुरे दिन आले आहेत.''