पुणे आयकर अधिकाऱ्यांच्या मोटारीला अपघात; निरीक्षक ठार, दोन जखमी 

पुणे आयकर अधिकाऱ्यांच्या मोटारीला अपघात; निरीक्षक ठार, दोन जखमी 

देहूरोड : तळेगाव दाभाडे येथे कारवाई करून पुण्याला परतणाऱ्या स्वारगेट पुणे येथील आयकर सधन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीस पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड नजीक झालेल्या अपघातात विभागाचा एक निरीक्षक ठार झाला तर उपसंचालकासह दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी सहाच्या सुमारास झाला.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक त्यागी (वय २८ वर्ष, रा. हडपसर पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुर्देवी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते आयकर सधन पुणे विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते.याच विभागाचे उपसंचालक आनंद उपाध्याय (वय ४० वर्ष) आणि त्यांचे सहकारी अधिकारी कृष्णकुमार मिश्रा (वय ४० वर्ष) हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथम सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर त्यांना हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : दोन मोटारीतून आलेल्या आयकर सधन पुणे विभागाच्या १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने तळेगाव दाभाडे येथील आरएमसी उद्योगावर बुधवारी (ता २२) छापा घातला. सदर कारवाई रात्रभर सुरू होती. ही कारवाई आटोपून पथक गुरुवारी सकाळी माघारी निघाले होते. त्यापैकी एका मोटारीने मार्गातील अमरदेवी मंदिर पास केले होते. मागील मोटारीने तळेगाव सोडत सोमाटणे टोल नाका पास केल्यावर पुढे अमरदेवी मंदिरानजीक लोखंडी अँगल घेऊन पुणे बाजूला निघालेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिली. धडक अतिशय जोरात बसल्याने मोटारीची डावी बाजू अर्ध्याहून अधिक चिरली गेली. त्यात त्यागी हे ठार झाले तर उपाध्याय आणि मिश्रा हे जखमी झाले.

अपघातानंतर सोमाटने बाजूला काही अंतरापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. सकाळच्या प्रस्तुत प्रतिनिधिने देहूरोड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अरुण मोरे व पथकाने घटनास्थळी धाव घेत.

मात्र तत्पूर्वीच आयकरच्या उपस्थित अन्य अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात पोहोचविले होते. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यागी यांचा मृत्यू झाला. देहूरोड आणि ताळेगाव वाहतूक पोलिसांनी वाहतुक नियंत्रित केल्यावर तासाभराने मार्ग मोकळा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com