तीन महिन्यांत भाडेतत्त्वावर सायकली; 75 किलोमीटर लांबीचे मार्ग उभारणार 

representational image
representational image

पुणे : शहरात राबविण्यात येणाऱ्या सायकल योजनेअंतर्गत पुणेकरांना पुढील तीन महिन्यांत भाडेतत्त्वावर सायकली मिळण्याची शक्‍यता आहे. या योजनेत टप्याटप्प्याने एक लाख सायकली उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सध्याच्या सायकल मार्गांची दुरुस्ती करणार आहे. त्यात, नव्याने 75 किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग उभारण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

या योजनेत खासगी कंपन्यांना सामावून घेणार असून, त्यामुळे प्रत्यक्ष सायकल खरेदीसाठी महापालिका गुंतवणूक करणार नाही. मात्र 330 कोटींच्या पायाभूत सुविधा पालिका उभारणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात पुढील तीन वर्षांत तरतूद केली जाणार आहे. नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध करून देण्यासाठी शहराचा एकात्मिक सायकल आराखडा तयार केला आहे. सायकल विक्रेते, त्यांची दुरुस्ती करणारे, तसेच सायकली भाड्याने देणारे दुकानदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अडचणी जाणून घेऊन नियोजन करणार आहे.

या योजनेनुसार एक लाख सायकलींचा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. सायकली भाड्याने देण्यासाठी विविध भागात 'स्टेशन' उभारणार आहेत. ही योजना राबविण्याबाबत काही खासगी संस्थांनी पालिकेकडे विचारणा केली आहे. त्यानुसार या कंपन्या स्वखर्चाने सायकली पुरविणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागविले आहेत. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढील प्रक्रिया पूर्ण कली जाणार आहे. 

सायकल योजना राबविताना पायाभूत सुविधा पुरविणार आहे. नवे मार्ग, तेथे आवश्‍यक ती यंत्रणा निर्माण केली जाईल. पहिल्या टप्प्यातील कामासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 70 कोटींची तरतूद आहे. त्यातून काही कामे हाती घेणार आहेत. 
- श्रीनिवास बोनाला, अतिरिक्त नगरअभियंता, महापालिका 

शहराच्या दृष्टीने सायकल योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे तिची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. पुढील अर्थसंकल्पात आवश्‍यक तेवढी तरतूद केली जाईल. येत्या तीन महिन्यांत काही प्रमाणात सायकली रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. 
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती 

शहरातील सायकल मार्गाचे जाळे : 824 कि.मी. 

  • रंगीत सायकल मार्गिका : 154 कि.मी. 
  • ग्रीन-वे (नदी, ओढ्यालगत) : 75 कि.मी. 
  • ग्रीन-वे, तसेच रंगीत लेन : 11 कि.मी. 
  • सध्या असलेले सायकल मार्ग : 94 कि.मी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com