गरम पाण्याच्या बादलीवर पडल्याने 26 दिवसांचे बालक गंभीर जखमी

गरम पाण्याच्या बादलीवर पडल्याने 26 दिवसांचे बालक गंभीर जखमी

पुणे : कोवळ्या उन्हात थांबून आंघोळीसाठी जात असताना पाय घसरून गरम पाण्याच्या बादलीवर पडल्याने 26 दिवसाचे नवजात बालक व वडील भाजले आहेत. नवजात बालक गंभीर भाजल्याने ससून हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगीर मुजाहीर शेख व 26 दिवसाचे बालक ( रा. कोंढवा खुर्द भाग्योदय नगर सुमित्रा अर्पाटमेंट) असे दोघे यात भाजले गेले.

कोंढवा खुर्द येथील भाग्योदय नगर मधील गल्ली नंबर तीन मध्ये सुमित्रा अर्पाटमेंट मधील तिसरया मजल्यावर फ्लॅट नंबर तीन मध्ये सगीर मुजाहीर शेख व पत्नी सिमा सगीर शेख यांचे कुटूंब राहत आहे. त्यांना तीन मुली व 26 दिवसांचा एक मुलगा आहे.

आज सकाळी सगीर शेख मुलाला घेऊन कोवळ्या उन्हात थांबले होते. बालकाला आंघोळ घालण्यासाठी हाॅलमध्ये प्लास्टिकच्या बादलीत हिटर सुरू करून पाणी गरम केले होते. हाॅलमध्ये ते येत असताना फरशीवर पाणी सांडले असल्याने त्यांचा पाय घसरला. नवजात बालकासह ते शेजारील बादलीवर पडले.

गरम पाणी असल्याने बालकासह ते जखमी झाले. नवजात बालक असल्याने त्यास गंभीर जखम झाली आहे. उपचारासाठी त्यांना ससून हॅास्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास हवालदार एल. गुजले करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com