राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेता कॉंग्रेसच्या वाटेवर? 

राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेता कॉंग्रेसच्या वाटेवर? 

कामशेत - मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटबाजीला कंटाळून एका ज्येष्ठ नेत्यासह अनेक कार्यकर्ते लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या नेत्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

मावळ तालुक्‍यात गेल्या पंचवीस वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे नुकसान झाले आहे. त्यातूनच मदन बाफना, बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे यांचा पराभव झाला. आगामी काळात ही गटबाजी थांबेल, असे वाटत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत गटबाजी पुन्हा उफाळून आली. सध्याही पक्षात दोन गट पडले असून, एकमेकांच्या कार्यक्रमालाही कोणी जात नाही. गेल्या दोन महिन्यांत मावळात झालेल्या अजित पवार यांच्या कार्यक्रमांना विविध कारणावरून अपमानास्पद वागणूक दिल्याने माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे यांच्यासह अनेकांनी कार्यक्रमाला पाठ फिरवली. 

बारामतीकरही हतबल 
मावळ-मुळशीतून तत्कालीन कॉंग्रेसचे नेते मामासाहेब मोहोळ यांनी कॉंग्रेस रुजवली. त्यापुढे रघुनाथ सातकर व अण्णासाहेब ढमाले यांनी कॉंग्रेसची मुळे खेडोपाडी पोचविली. माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी जनसंघाचा विचार सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाला साथ दिली. माजी मंत्री मदन बाफना यांनी विधिमंडळात मावळाची छाप उमटवली. राज्याच्या इतिहासात मावळला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असते. मात्र, गटबाजीमुळे मावळातील कॉंग्रेस विचार धोक्‍यात आले. पहिल्या फळीपाठोपाठ दुसऱ्या फळीनेही तीच री ओढली. वडगाव, तळेगाव, कान्हे, माळवाडीपर्यंत मर्यादित असणारी गटबाजी खेडोपाडी पोचली आहे. बारामतीकरांनी पुढाकार घेऊनही मावळातील गटबाजी थांबत नाही. 

""राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते व त्यांचे असंख्य कार्यकर्ते लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे आगामी काळात मावळात कॉंग्रेसचा आमदार होईल.'' 
चंद्रकांत सातकर, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com