नीरा-भीमा नदीजोड अपघातप्रकरणी 4 जणांवर गुन्हा

Neera-bheema-river
Neera-bheema-river

अकोले (इंदापूर) : येथील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगदयातील अपघात प्रकरणी भिगवण पोलिसांनी अखेर ३१ तासानंतर चार जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी क्रेन ऑपरेटर रामबहादूर रामाआसरे पाल (वय 34, रा. तेंदली लाखीकुंटा जि. फत्तेपूर, उत्तरप्रदेश), नवीन कुमार रविदत्त शर्मा (वय 32, रा. मेदपुरा जि. अलवर, राजस्थान), मुरलीकृष्णा शिवाजीराव मेहरदरा मेठला (वय 42, रा. नेढमानुरू जि. कृष्णा राज्य आंध्रप्रदेश) व  श्रीधर वाल्हेश्वराव वेझढला (वय 43, रा. पालवंचा जि. खम्मम तेंलगणा) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०४ (२) ३४ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भानुदास विठ्ठल पवार पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास साहय्यक पोलिस निरीक्षक एन.एम. राठोड करीत आहेत.

अकोले येथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगदयामध्ये सोमवार (ता. २०) रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास क्रेन वायर रोप तुटून ट्रॉली ७० मीटर बोगदयामध्ये पडून झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा मूत्यू झाला होता. या घटनेमध्ये एक स्थानिक युवकासह परराज्यातील सात युवकांचा समावेश होता. 

मृतांची नावे पुढील प्रमाणे - 
राहूल सुग्रीव नरूटे (वय 23 रा. काझड ता इंदापूर जि पुणे), संतोष सुशांत पांदी (वय 32 रा. सिंहमर्दन पालकसंधा जि. गंजम ओरिसा), बलराम स्वराज स्वाईन (वय 32 रा. पालकसंधा जि. गंजम ओरिसा), संभाजी सिमाचलम नायडू (वय 37 रा. थोटापल्ली गौरीपुरम जि. विजयनगर आंध्रप्रदेश), अन्वेश सिध्दारेड्डी (वय 24 रा. नेल्लूर आंध्रप्रदेश), मुकेशकुमार जवाहरलाल मौर्या (वय 26 रा. भैसाहा महावरी जि. जौनापुर, उत्तरप्रदेश), सुरेद्र बच्चाऊ यादव (वय 25 रा. बडगाव ठाणा जुगेल जि. सौनाभद्रा उत्तरप्रदेश), छोटु भोलू कोल (वय 19 रा. बडगाव ठाणा जुगेल जि. सौनाभद्रा उत्तरप्रदेश)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com