आता वेध अंतिम फेरीचे!

आता वेध अंतिम फेरीचे!

ऐतिहासिक चित्रपटाचे लेखन करताना जर लिहिलेली प्रत्येक गोष्ट इतिहासात जाऊन पडताळण्याची संधी मिळाली तर? आणि ही फेरतपासणी करताना आजवर शिकलेला- ऐकलेला इतिहास चुकीचा आहे, असं लक्षात आलं तर? पुन्हा वर्तमानात येऊन तो इतिहास बदलता येऊ शकेल? इतिहासाची अशी हवी तशी पुनरावृत्ती करणं शक्‍य आहे? ‘इतिहास गवाह है’, असं म्हणत अंतिम फेरीत आपले स्थान निश्‍चित करणाऱ्या बीएमसीसीच्या संघाच्या सादरीकरणाने असे अनेक प्रश्‍न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले. भव्य-दिव्य नेपथ्य, उत्तम संगीत आणि उत्कृष्ट संवाद लेखन असे पॅकेज घेऊन रंगमंचावर आलेल्या या प्राथमिक फेरीतल्या शेवटच्या एकांकिकेने ४० मिनिटे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या निमित्ताने देशात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सिनेमॅटिक लिबर्टी’वर बेतलेल्या या एकांकिकेच्या निमित्ताने एकाच कथेत विविध विषयांचे संक्रमण अनुभवता आले.

यंदा पहिल्यांदाच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादच्या संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले. पुणे शहरातील महाविद्यालयांशिवाय अंतिम फेरीत जाणारा हा पहिलाच संघ असून, आदिवासी नृत्यपरंपरेवर आधारित ‘कथेकरी’ ही एकांकिका प्रेक्षकांसोबत परीक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. झारखंडचे लेखक हंसदा शेखर यांनी लिहिलेल्या ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या सत्यघटनेवर आधारित या एकांकिकेने आदिवासी जीवनाची सत्य परिस्थिती प्रेक्षकांसमोर उभी केली. कोणतेही पाठबळ नसताना, आदिवासीपाड्यातील एका वृद्धाने सरकारी यंत्रणांना केलेला विरोध या एकांकिकेत पाहायला मिळाला. आदिवासी कला सादर करण्यासाठी सरकारकडून निमंत्रण मिळाल्यावर तयारी करण्याचा एक महिना दाखविण्यासाठी ‘फोल्डिंग ॲनिमेशन’ या अनोख्या इव्हेंटचा वापर या संघाने केला. 

अंतिम फेरीत निवड झालेली महाविद्यालये 
(सादरीकरणाच्या क्रमानुसार)
१. सर परशुराम भाऊ महाविद्यालय (सरयल)
२. विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (किबो)
३. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (झर्मिना)
४. पीईएस मॉर्डन अभियांत्रिकी महाविद्यालय (मूक आक्रंदन)
५. श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (नॉट अगेन)
६. मॉडर्न कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय (आहुती)
७. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (प्लेअर टू)
८. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद (कथेकरी)
९. बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (इतिहास गवाह है)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com