दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून

Exam
Exam

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक आज (बुधवार) जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून तर बारावीची परीक्षा 21 फेब्रवारी 2018 पासून घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार असून, ही परीक्षा नियमित, व्यावसायिक आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रम शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तसेच दहावीची लेखी परीक्षा 1 ते 24 मार्चपर्यंत होणार आहे. या परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पुणे, मुंबई, कोकण, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर आणि अमरावती अशा नऊ विभागीय केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.maharashtra.gov.in देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दहावी, बारावीची परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार 
याकडे अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आता राज्य शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे.

दरम्यान, यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर आक्षेप आणि सूचना मागविण्यात आल्याने त्यानुसार वेळापत्रकात बदल करण्यात आला. मात्र, हे संभाव्य वेळापत्रक असून, परीक्षेपूर्वी शाळा किंवा महाविद्यालयात जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com