मिरणवूणकीच्या खर्चाची रक्कम ग्रामदैवताच्या जीर्णोद्धारासाठी

Walchandnagar
Walchandnagar

वालचंदनगर (पुणे) : जंक्शन (ता. इंदापूर) येथील शिवकल्याण राजा प्रतिष्ठानने शिवजयंती उत्सवामध्ये मिरवणूकीवरती होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन शिल्लक रक्कम ग्रामदैवत नंदिकेश्‍वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देण्याचा विधायक उपक्रम राबविला.

जंक्शन येथे शिवकल्याण राजा प्रतिष्ठानच्या वतीने येथे प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी केली जाते. या वर्षी प्रतिष्ठानने मिरवणूकीच्या होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन मिरणवणूकीमध्ये खर्च होणारी रक्कम ग्रामदैवत नंदिकेश्‍वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देण्याचा  निर्णय घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी केली.

आमदार दत्तात्रेय भरणे व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, एम.बी.मिसाळ, डॉ.संजीव लोंढे, वंसत मोहाेळकर, सागर मिसाळ, तुषार घाडगे, दशरथ वाघ, दिलीप लोहकरे, लालासाहेब सपकळ, शंकर केवारे, रोहित मोहोळकर, मंगेश गांधी उपस्थित होते. यावेळी  भरणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. समाजातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन स्वराज्याची स्थापना केली.  युवकांनी छत्रपतीच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा.

शिवकल्याण राजा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचाही इतर सार्वजनिक उत्सव मंडळांनी आदर्श घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामेश्‍वर माने, संजय शिंदें, विष्णू माने, केशव देसाई अॅड. सुरज बाबर, अक्षय निकम, सुरज माने यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलिक सोनवणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com