पुणे - भावी वधुने घातला तरुणाला ऑनलाइन गंडा 

Online Fraud
Online Fraud

पिंपरी (पुणे) : भारत मॅट्रोमोनीवर नाव नोंदणी केली असता एका तरुणीने लग्नाकरिता तरुणाशी संपर्क केला. त्यानंतर त्या तरुणाचा विश्‍वास संपादन करीत तब्बल एक लाख 60 हजार 700 रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. ही घटना सांगवी येथे घडली. 

नितीन जोशी (वय 31, रा. पंचरत्न नगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 23 जानेवारी ते 18 फेब्रुवारी ही घटना घडली. पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांनी विवाह करिता भारत मॅट्रोमोनी या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. त्यांची ही माहिती पाहून एका तरुणीने त्यांना विवाहाकरिता फोन केला. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढत गेली.

भावी वधूने परदेशातून आलेला माल सोडविण्यासाठी आपल्याला कस्टममध्ये भरण्यासाठी पैसे हवे असल्याचे जोशी यांना सांगितले. त्यानुसार जोशी यांनी भावी वधूच्या खात्यावर एक लाख 60 हजार 700 रुपये भरले. त्यानंतर त्या तरुणीने जोशी यांच्याशी फोनवरील संपर्क संपुष्टात आणला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com