पत्नीचा डोक्यात दगड घालून खून

crime Murder
crime Murder

तळेगाव स्टेशन (पुणे) : स्वयंपाक बनवला नाही म्हणून दारुच्या नशेतील पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे शिवारातील एका वीटभट्टीवर बुधवारी रात्री घडली.

शारदा अशोक चौरे (४०,दरेकर वीटभट्टी,नवलाख उंबरे,मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून,आरोपी तिचा पती अशोक विठ्ठल चौरे (४५,दरेकर वीटभट्टी,नवलाख उंबरे,मावळ,मावळ) याला एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी नवलाख उंबरे गावातूनच अटक केली आहे. या प्रकरणी देवेश शंकर वाघमारे (१७,दरेकर वीटभट्टी,नवलाख उंबरे,मावळ) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मूळचे खेड तालुक्यातील असलेले चौरे कुटुंब तळेगाव एमआयडीसीनजीकच्या नवलाख उंबरे शिवारात, श्रीनिवास कंपनी जवळील भगवान संतू दरेकर यांच्या वीट भट्टीवर मागील काही दिवसांपासून काम करण्यासाठी राहते.

बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान,दारुच्या नशेत असलेल्या अशोक चौरे स्वयंपाक बनवला नाही म्हणून रागाने आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड खून केला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती तपासी अधिकारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिली. देहूरोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगूळकर आणि सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com