शेतकऱ्यांना मिळणार नीराच्या डाव्या कालव्याच्या पाण्याची दोन आवर्तने

valchandnagar
valchandnagar

वालचंदनगर (पुणे) : उन्हाळी हंगामामध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नीरा डावा कालव्यातुन पाण्याची  दोन आवर्तने देण्याच्या महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. यामुळे तालुक्यासह कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आजपासून  (मंगळवार ता.१३) पासुन कालव्याला पाणी सोडण्यास सुरवात होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. 

नीरा खोऱ्यातील धरण साखळीतील पाणी नियोजनासाठी  सोमवारी (ता. १२) मुंबईमध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठक पार पडली. चालूवर्षी धरणातून नीरा डावा कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने देण्यात आली होती. या आवर्तानांसाठी ६.५ टीएमसी पाण्याचा वापर अपेक्षीत धरला होता. मात्र  कालवा सल्लागार समिती व पाटबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे ०.९१२ टीएमसी पाण्याची बचत झाली असून प्रत्यक्षामध्ये ५.५८८ टीएमसी पाण्याचा वापर झाला. बचत झालेल्या पाण्याचा उपयोग उन्हाळी अावर्तनासाठी करण्यात येणार आहे. 

उन्हाळ्यासाठी ७.३५६ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मागील रब्बीच्या हंगामातील शिल्लक राहिलेले पाणी उन्हाळी हंगामासाठी वाढवून देण्यात येणार असल्यामुळे उन्हाळ्यासाठी ८.५८४ टीएमसी पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे नीरा डावा कालव्याला चालू वर्षी मुबलक पाणी राहणार असून १११ दिवस पाणी सुरु राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अाहे. उन्हाळ्याच्या हंगामातील पाण्याचे पहिले आवर्तन आजपासून मंगळवार (ता. १३) पासुन सुरु होणार असून ७ मे पर्यंत सुरु राहणार आहे. तर दुसरे आवर्तन ८ मे रोजी सुरु होणार असून ७ जुलैपर्यंत सुरु राहणार असून उन्हाळ्यात ११३ दिवसांपैकी ११२ दिवस कालव्याला पाणी राहणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. या बैठकीस जलसंपदामंत्री विजय शिवतरे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार हनुमंत डोळस, संग्राम थोपटे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता मुंडे, अधीक्षक अभियंता चोपडे, कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधारे कोरडे पडले असून गेल्या अनेक दिवसापासुन नीरा नदीमध्ये धरणातुन पाणी सोडण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.या मागणीला जलसंपदा मंत्री विजय शिवतरे यांनी हिरवा कंदील दाखवला अाहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरवा केल्यामुळे सरकार व प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com