पुणे - मांजरीत श्रीपाद छिंदमच्या निषेधार्थ मूकमोर्चा

Rally
Rally

मांजरी (पुणे) : अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ महादेवनगर येथील नागरिकांनी मूकमोर्चा काढला होता. छिंदमच्या निषेधाचे फलक दाखवत त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मोर्चातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळी दहा वाजता आण्णासाहेब मगर महाविद्यालयाजवळ मोर्चाला सुरूवात झाली. महिला व तरूण कार्यकर्त्यांचा त्यामध्ये मोठा सहभाग होता. संपूर्ण महादेवनगर परिसरातील रस्त्यावरून हा मोर्चा नेण्यात आला. मोर्चातील मार्गावर ठिकठिकाणी छिंदमच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. मंदाकिनी नलावडे, अनिता भाडळे, श्वेता खरात यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. महेश नलावडे, शिवाजी भाडळे, श्रीपाद घुले, गिरीष खरात, पितांबर धिवार, बळीराम गायकवाड, सोमनाथ काशिद, अक्षय भाडळे आदी यावेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com