शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग बाणेरपर्यंत वाढविण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 'शिवाजीनगर ते हिंजवडी' मेट्रोच्या बाणेर बालेवाडी मार्ग बालेवाडी स्टेडियम ते बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक बाणेरपर्यंत वाढवावा, असे निवेदन स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांना शुक्रवारी दिले. 

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा बाणेर बालेवाडी मार्ग हा बाणेर बालेवाडी गावाच्या हद्दीतून आणि या भागातील रस्त्याजवळून जात आहे. या मार्गातील बालेवाडी येथील लक्ष्मीमाता मंदिर ते बालेवाडी फाटा हा रस्ता 24 मीटर रुंदीचा आहे.

या रस्त्याची रुंदी वाढवून 30 मीटर करण्यासाठी पुणे महापालिकेकडे प्रस्ताव दाखल आहे; परंतु त्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्‍यता आहे. सद्यस्थितीतील बांधकामे व वाहतूक कोंडीचा विचार करता बालेवाडी 'हायस्ट्रीट'चा तीस किलोमीटर रुंदीचा रस्ता हा पर्यायी मार्ग असून या ठिकाणी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे हा बदल करावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: marathi news Pune News Pune Metro PMRDA