अंथुर्णेमध्ये रास्ता रोको आंदोलन

Anthurne
Anthurne

वालचंदनगर : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील ग्रामस्थांनी कोरेगाव-भीमा मध्ये घडलेला घटनेचा निषेध करुन गावामध्ये कडकडीत बंद पाळून रास्तारोको आंदोलन केले. कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना करण्यास गेलेल्या नागरिकांवर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात गावोगावी होऊ लागला आहे. अंथुर्णे येथील व्यापाऱ्यांनी आज (ता. २) रोजी  दिवसभर बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. आज सकाळी नागरिकांनी बारामती-इंदापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करुन रास्ता रोखून घरुन भीमा कोरेगाव घटनेतील आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. रास्तारोको आंदोलनामध्ये कालिदास साबळे, अंबादास साबळे, राहुल साबळे, अॅड. शिवराज साबळे यांनी मनोगत व्यक्त करून कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला.

यावेळी राजकुमार साबळे, गोरख साबळे, प्रदीप साबळे, पिंटू साबळे, अनुप साबळे, शेखर काटे, भीमराव साबळे, निखील दणाणे, नितीन निकाळजे, संदीप साबळे, अतुल साबळे, गणेश साबळे, प्रतिक साबळे, महेंद्र साबळे, गौरव साबळे, पप्पू वाघमारे, सुधीर साबळे, पपेश भोसले, बाळू वाघ यांनी रास्तारोको आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आरपीआय युवकचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष सूरज वनसाळे यांनी तहसिलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सज्जन हंकारे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांना निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com