समाजकल्याण सभापतींनी साधला आदिवासी नागरिकांशी संवाद

पराग जगताप
बुधवार, 17 जानेवारी 2018

ओतूर (ता.जुन्नर) : समाजकल्याण सभापतींनी जुन्नरच्या आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सुरेखाताई चौरे यांनी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ओतूर (ता.जुन्नर) : समाजकल्याण सभापतींनी जुन्नरच्या आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सुरेखाताई चौरे यांनी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यांनी मंगळवारी दिवसभर जुन्नर तालुक्यातील अति दुर्गम डोंगरावर वसलेल्या कोपरे, मांडवे, मुथाळने, जाभूळशी या आदिवासी भागातील गावांच्या पहाणी दौर्यावर आल्या होत्या. यावेळी नागरिकांच्या समाजकल्याण विभागाकडून असलेल्या अपेक्षा व नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तसेच मागसवर्गिय नागरिकांनी वैयक्तीक लाभाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यानी यावेळी केले. 

यावेळी त्यांच्या बरोबर जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी समाज कल्याण सभापती तुळशीराम भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे, गटविकास अधिकारी सतिश गाढवे, स्वीय सहायक विकास पापळ, शिक्षणचे विस्तार अधिकारी डी.बी.खरात, घरकुलचे एस.एस.साळुखे, बुधाजी शिंगाडे, दिनकर जगताप, मुथाळणे सरपंच योगिता दाभाडे, कोपरे सरपंच ठमाजी कवटे, विठ्ठल कवटे, गणेश उकिर्डे हे व इतर या पहाणी दौर्यात सहभागी झाले होते.

या पहाणी दौर्यात सभापती सुरेखाताई नी कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी या गावांमधून पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला येणारे सर्व प्रस्तावांना अग्रक्रम घेऊन मंजूर केले जातील. तसेच या भागातील विकासासाठी अतिरीक्त निधी उपलब्ध करुन देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर या गावामधील विविध प्रकारच्या महीला बचत गटांना महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार निर्मीतीसाठी व्यावसायिक यंत्रसामुग्री त्यात शेवई मशिन, पापड मशिन व इतर मशिन तसेच शेळी गट योजना तसेच मागसवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच या अदिवासी भागातील सर्वात मोठा पाणी प्रश्न असून या गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी नमूद केले.

यावेळी या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांशी आणि जिल्हा परिषद शाळा व मुथाळणे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी व शाळेमधील सुविधा विषयी समाधान व्यक्त केले.

 

Web Title: Marathi news pune news samajkalyan speaker meets tribal areas people