मानवतावाद शिकविणारे संत साहित्य दिशादर्शक

pune
pune

वारजे माळवाडी : "खून, बलात्कार, आत्महत्या दरोडे, दहशतवाद, नक्षलवाद यामुळे समाज स्वास्थ बिघडत असून त्याला मानवता वादाची शिकवण देणारे संत, देव साहित्यच खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे." असे मत संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वारजे माळवाडी येथे नगरसेविका दीपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा ऊर्फ प्रदीप धुमाळ यांनी आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन मोरे यांच्या हस्ते झाले. 
यावेळी काका चव्हाण, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेविका सायली वांजळे, लक्ष्मी दुधाने, नगरसेविका दीपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ, संस्कृती प्रकाशनाच्या प्रमुख सुनीताराजे पवार व्यासपीठावर उपस्थित होते. 

मोरे म्हणाले, संत साहित्य हे विश्वाला वैचारिक विचार देणारे असल्याने असे साहित्य शाळा कॉलेजमध्ये सक्तीचे झाले पाहिजे. गुन्हेगार, शिक्षा झालेले आरोपी यांचे मत परिवर्तन करण्यासाठी प्रबोधनकार विचारवंत यांना बोलविले जाते. त्यांच्या बेताल वक्तव्य व साहित्याची गरज नाही. परन्तु खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातील सूड बुद्धी कमी करण्यासाठी मानवता माणुसकी असणारे संत साहित्य महत्त्वाचे आहे. मानसिक चिंता नाही तर चिंतन करणारे साहित्य पाहिजे.

धुमाळ म्हणाले, शरद पवार यांची वाचण्याची आवड अनेकांना माहिती ते रोज झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतात  असल्याने त्यांची ही चांगली सवय जोपासण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. येथे विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत."
चव्हाण म्हणाले, "विज्ञान तंत्रज्ञानमुळे समस्या वाढत आहे. वाचन संस्कृती कमी होत आहे. 

बराटे म्हणाले, "आपल्या जिल्ह्याला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांची परंपरा व साहित्य मार्गदर्शक आहे. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पवार साहेबांनी जपला."
नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com