मावळ स्टोन क्रशर संघटनेची अनोखी शिवजयंती

Talegao
Talegao

तळेगाव स्टेशन (पुणे) : खऱ्या अर्थाने रयतेचा राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मावळ तालुका स्टोन क्रशर उद्योजक संघटनेच्या वतीने आगळयावेगळया उपक्रमाने साजरी करण्यात आली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मयताच्या कुटुंबाला 25 हजारांची मदत करत एक नवीन आदर्श घालून दिला.

गेल्या 2 डिसेंबरला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने धडक दिल्याने मावळ तालुक्यातील शेटेवाडी-आंबळे येथील रहिवाशी कै. शिवाजी गंगाशे यांचा मृत्यू झाला. हातावर पोट भरणारे गंगाशे यांचे कुटुंब यामुळे उघड्यावर पडले. त्यांच्या पश्चात असलेली पत्नी उषा आणि तीन मुले यांच्या समोर उदरनिर्वाहाचा, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. समाजकार्यात सदा अग्रेसर असलेेेेल्या मावळ तालुक्यातील युवा स्टोन क्रशर उद्योजकांनी ठरवल्यानंतर या शिवजयंतीनिमित्त मावळ तालुका स्टोन क्रशर उद्योजक संघटनेच्या वतीने सदर कुटुंबाला रोख पंचवीस हजार रुपयांची मदत सुपुर्द केली. आज शिवजयंतीच्या दिवशी उद्योजक किरण काकडे, सागर पवार, विक्रम काकडे, सुदाम शेळके, श्रीकांत वायकर आदींनी सदर महिलेस ही मदत सुपूर्द केली. अनपेक्षित मदतीने भारावलेल्या महिलेने सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

"संकटकाळी रयतेचे रक्षण करुन मदतीचा हात देण्याचा करण्याचा शिवछत्रपतींचा आदर्श शिवजयंतीला पाळूनच संघटनेच्या वतीने गरजूला संकठसमयी मदत केली आहे." -विलास  काळोखे (अध्यक्ष मावळ तालुका स्टोन क्रशर संघटना)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com