शिवजयंतीच्या निमित्ताने समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळावा- हर्षवर्धन पाटील

Bhigwan
Bhigwan

भिगवण () : छत्रपती शिवाजी महाराजांनी रंजल्या गांजल्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली याची जाणिव प्रत्येकाने ठेवावी. शिवजयंती साजरी करत असताना समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे. येथील शिवतेज ग्रुपच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने तीस शाळकरी मुलामुलींसाठी सायकलींचे वाटप व गरजु मुलांची शालेय फी भरण्याचा उपक्रम स्तुत्य आहे त्याचे इतरांनीही अनुककरण करावे असे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

येथील शिवतेज ग्रुपच्या वतीने येथील भैरवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पुजन तसेच तीस शाळकरी मुले व मुलींना सायकलींचे वाटप व इयत्ता दहावीच्या गरजु विद्यार्थ्यांची शालेय फी शिवतेज ग्रुपच्या वतीने शाळेस देण्यात आली. कार्यक्रमास माजी सभापती रमेश जाधव, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मारुती वणवे, पंचायत समितीचे सदस्य संजय देहाडे, अशोक शिंदे, पराग जाधव, संपत बंडगर, अजिंक्य माडगे, रंगनाथ देवकाते, रणजीत भोंगळे, संजय चौधरी, रियाज शेख, राजकुमार मस्कर, रामचंद्र कदम, प्राचार्य भास्कर गटकुळ शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजित जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब सुर्यवंशी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सर्वसामान्य माणुस केंद्रीभुत मानुन काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार मांडला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलुवर प्रकाश टाकला पाहिजे. शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या सायकलीमुळे व गरजु मुलांची फी भरल्यामुळे या मुलांच्या शालेय अडचणी दुर होण्यास मदत होईल. 

यावेळी रमेश जाधव, अशोक शिंदे, दत्तात्रय पांढऱे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अभिजीत जगदाळे यांनी केले सुत्रसंचालन स्वाती कडु यांनी केले तर आभार संजय रायसोनी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन शिवतेज ग्रुपच्या सदस्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com