श्रीपाद छिंदमला येरवडा कारागृहात हलवले

Shripad Chindam
Shripad Chindam

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरणारा नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम यास सुरक्षेच्या कारणास्तव शनिवारी नगरहून हलवून पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आले. याबाबतची माहिती पोलिसांनी गुप्त ठेवली आहे. 

नगर महापालिकेतील एका कर्मचाऱ्यास कामाचा जाब विचारताना छिंदम याने शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरले होते. पालिका कर्मचारी व छिंदम यांच्यातील संभाषण समाजमाध्यमातून पुढे आल्यानंतर तमाम शिवप्रेमींनी छिंदम याचे घर, कार्यालय फोडून संताप व्यक्त केला. छिंदम प्रकरणावरून संपूर्ण राज्यात रोष व्यक्त करण्यात आला. 

दरम्यान, छिंदमला मारहाण झाल्याची अफवा समाजमाध्यमांद्वारे पसरली होती. या पार्श्‍वभूमीवर छिंदमला सुरक्षेच्या कारणास्तव नगर व्यतिरिक्त अन्य कारागृहात ठेवण्याचा निर्णय नगर पोलिसांनी घेतला होता. शनिवारी दुपारी त्यास नगरहून हलविलेही. येरवडा कारागृहात त्याला नेण्यात आले. मात्र येरवड्यास हलविले की, नाशिकला याचे उत्तर पोलिसांनी दिलेच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com