सिंहगडावर तानाजी मालुसरेंना अभिवादन

Singhgad Fort
Singhgad Fort

खडकवासला : नरवीर तानाजी मालुसरे यांना माघ वद्य नवमी या 348व्या पुण्यसमरण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनेक शिवप्रेमींनी सिंहगडावर समाधी स्थळी गर्दी केली होती. दरम्यान, अनेक अधिकारी यावेळी गैरहजर असल्याने आमदार भीमराव तापकीर यांनी नाराजी व्यक्त केली.

श्रीअमृतेश्वर, श्रीकोंढणेश्वर मंदिरात व नरवीर यांच्या समाधीला व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीला सकाळी अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते पूजा व या अभिशेक करण्यात आला. त्यांनी उपस्थित मान्यवरांनी हार अर्पण करून अभिवादन केले.

आमदार भीमराव तापकीर, सहायक गट विकास अधिकारी अशोक जाधव हवेलीचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, पंचायत समिती सदस्या सीमा पढेर, महिला बाल कल्याण अधिकारी सुनील जाधव, सरपंच रेखा खाटपे, उपसरपंच पांडुरंग सुपेकर, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जोरकर, बांधकाम विभागाचे उपअभियंता रवी चेनाळे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी म्हत्रे, सदस्य अमोल पढेर, ग्रामसेवक भरत ओंबासे, सुनील खैरनार, रवींद्र सोनवणे, प्रकाश व्हटकर, राजेंद्र निवंगुणे, विश्वनाथ मुजुमले, भाऊसाहेब गोगावले, दत्ता चव्हाण यावेळी उपस्थित होते. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, समन्वयक नितीन वाघ यांच्या हस्ते गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास समाधीचे पूजन करून अभिवादन केले. आदित्य बांडे हवालदार, संतोष गोपाळ, उमेश होलर, राजू सट्टे, तानाजी थोपटे, सुशांत खिरीड, दशरथ खिरीड, प्रदीप जगताप, शिव प्रतिष्ठानचे शैलेश कदम, सतीश कोटे, आदित्य मांजरे, निखील होनकरपे, संकेत गायकवाड, ओंकार म्हेत्रे, सिंहगड पावित्र्य मोहिमेचे महेश मोकाशी, शंकर सरपाटील उपस्थित होते. त्यानंतर, जागर सभा घेण्यात आली. नरवीरांची महती यावेळी सांगण्यात आली. यावेळी ध्येय व प्रेरणा मंत्राने सांगता केली. 

अधिकाऱ्यांची अनुउपस्थिती 
नरवीर तानाजी मालुसरे यांनी शुभकार्य बाजूला ठेवून स्वराज कामास हातभार लावला. परंतु त्यांच्या पुण्यतिथीला उपस्थित राहून अभिवादन करण्यासाठी देखील आजच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. असे सांगत आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळशी बोलताना नाराजी व्यक्त केली. गडावर कामे सुरु असलेल्या विभानगापैकी वन व पुरातत्व विभागाचे तालुका अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, महसूल विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी हजर नव्हते. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com