पुणे - महापालिकेच्या रूग्णालयात महिनाभरात सोनोग्राफी केंद्र सुरू

Hadapsar
Hadapsar

हडपसर (पुणे) : महापालिकेच्या कै. खासदार अण्णासाहेब मगर हॉस्पिटल मध्ये महिनाभरात सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून बंद असलेल्या प्रसुतिगृहाची दुरूस्ती करून ते महिनाभारत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब व गरजू गरोदर महिलांना प्रसुतीसाठी अन्य दवाखान्यात जावे लागणार नाही. 

या दवाखान्यातील प्रसुतीगृह नादूरूस्त असल्याचे कारणास्तव बंद होते. यापूर्वी या रूग्णालयाच्या दूरूस्तीचे काम करण्यात आले. मात्र ते निकृष्ट असल्याने प्रसुतिगृह बंदच ठेवावे लागले आहे. रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी पन्नास लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

नव्याने दुरुस्तीचे काम चालू करण्यात आले आहे. महापालिका बजेट देत नसल्याने दुरुस्तीचे रखडल्याने काम  करता आले नव्हते. येत्या एक महिन्यानंतर प्रसूतिगृह व सोनोग्राफी सेंटर सुरु करण्यात येणार आहे. प्रसूतिगृह बंद असल्याने हडपसर परिसरातील गरीब गरोदर मातांची मागील चार वर्षपासून गौरसोय होत होती. या रूग्णालयाची इमारत साठ वर्ष जुनी असल्याने इमारत व सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. 

मगर हॉस्पिटल मधील अर्ध्या भिंतीचे जुने ठिसूळ झालेले प्लास्टर काढून येथे नव्याने प्लास्टर केले जाणार आहे. भिंतीना ओल येत असल्याने तेथे स्टाईल बसवण्यात येणार आहे. फरश्या बदलण्यात येणार आहे. लिकेज काढण्यात येणार आहे. केसपेपर, मेडिकल रूम, डॉक्टर रूम मध्ये हि प्लास्टर व फरश्या बदलण्यात येणार आहे. रंग रंगोटी करण्यात येणार आहे. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली साबणे म्हणाल्या, मगर रूग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रूग्णालयातील प्रसुतिगृह सुरू करता येईल. 

नगरसेविका हेमलता मगर म्हणाल्या, कै. अण्णासाहेब मगर हे गरिबांसाठी महत्वाचे हॉस्पिटल आहे. मागील चार वार्षांपूर्वी नूतनी करणाच्या नावाखाली प्रसूतीगृह बंद करण्यात आले होते. रूग्णालयाची इमारत साठ वर्ष जुनी आहे. या ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रसूतीगृह व सोनोग्राफी सेंटर सुरु करणार आहोत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com