अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान

Takawe
Takawe

टाकवे बुद्रुक : अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुरड्याचा जीव वाचविणाऱ्या आंदर मावळातील अनसुटे येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्य तत्परतेची दखल घेऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने या अंगणवाडी सेवकांचा  गौरव केला. तसेच येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या सेविकांना गौरविण्यात आले. 

हिराबाई किसन लष्करी, शोभा गबाजी गायकवाड असे या सेविका व मदतनीस यांची नावे आहेत. त्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'विशेष सन्मान पुरस्कार 'देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, महिला बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांच्या सह अनेक मान्यवर व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीत हा सन्मान सभारंभ पार पडला. 
इंदोरीतील रंजना संभाजी शिंदे यांना आदर्श अंगणवाडी सेविका व काले कॉलनीतील माधुरी महेंद्र जव्हेरी यांना आदर्श मदतनीस पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, साडी चोळी, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

अनसुटेतील सार्थक चिंतामण मोरमारे या चिमुरड्याच्या जेवणाच्या एका इसमाने डब्यात थायमीठ हे विषारी औषध टाकून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला होता, वर्गात थायमीठचा उग्र वास आल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाणवले, त्यांनी वर्गातील मुलांनी डबे खाऊ नये अशी सुचना देऊन सुरूवातीला हा वास गॅस सिलेंडरचा आहे का याची चाचपणी केली, त्यानंतर मुलांचे डबे तातडीने पाहिले असता सार्थकच्या डब्यातील मसालेभात काळा पडला होता, त्यांनी वास घेतला असता हे थायमीठ असल्याचे जाणवले. ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन संबंधित इसमावर फौजदारी देखील दाखल करण्यात आली. त्यामुळे चिमुरड्याचा जीव वाचविणाऱ्या सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी मानून त्यांचा सत्कार येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हाय इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने लष्करी व गायकवाड यांचा समाजकल्याणचे माजी सभापती अतिष परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले, सचिव रामदास वाडेकर, संचालक तानाजी असवले, स्वामी जगताप, जुलेखा शेख, अलका म्हेत्रे  आदि उपस्थित होते. 
समाजकल्याणचे माजी सभापती अतिष परदेशी म्हणाले, "अंगणवाडी सेविकेच्या तत्परतेने आंदर मावळाला काळीमा लावणारी मोठी घटना टळली, अंगणवाडी सेविका शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवित आहेत, तरीही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाजी असवले यांनी प्रास्ताविक यांनी केले. प्रतिभा लंके यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी असवले यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com