अंगणवाडी शिक्षणामुळे बालकांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ : माने

 Pune News Walchandnagar News Anganwadi Education Pravin Mane
Pune News Walchandnagar News Anganwadi Education Pravin Mane

वालचंदनगर : अंगणवाडीमधील शिक्षणामुळे बालकांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मोलाची मदत होत असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केले.

लासुर्णे (ता. इंदापूर) येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत आयोजित बाल आनंदी मेळाव्यामध्ये बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप, पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंतराव नरुटे, छत्रपती कारखान्याचे संचालक अमोल पाटील, अॅड तेजसिंह पाटील, डॉ योगेश पाटील, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे, लासुर्णेच्या सरपंच निर्मला अनिल चव्हाण, उपसरपंच सुहास भोसले, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नेताजी लोंढे, विजय निंबाळकर, सुमित पारखे, राजेशकुमार खरात उपस्थित होते.

माने यांनी सांगितले, की जिल्हामध्ये ६ हजार ६०० अंगणवाड्या आहेत. तालुक्यामध्ये २८९ अंगणवाड्यामधून २६ हजार बालके शिक्षणाचे धडे गिरवत अाहेत. लहान मुलांची आकलन शक्ती जास्त असते. याच कालवधीमध्ये अनेक मुले अंगणवाडीमध्ये येत असतात. अंगवाडीतील शिक्षणामुळे त्यांचा बौद्धिक विकास होण्यास मोलाची मदत होत असते.

तसेच आजच्या काळातील मुली मुलांच्या बरोबरीने काम करीत असून आई, वडिलांनी मुलींमध्ये मुलगा पाहण्याची गरज आहे. एक मुलगी शिकली तर दोन घरांना शिकवत असल्याचे सांगितले. यावेळी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या  १५ महिलांचा सत्कार झाडांचे रोपटे देऊन  करण्यात आला.  अंगणवाडीतील बालकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. 

कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका उज्ज्वला जाधव, विस्तार अधिकारी तेजस जगताप, वनिता गाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी केले.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com