वालचंदनगरमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

walchandnagar
walchandnagar

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे पेढे वाटून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शिवजयंती उत्सव मंडळाने शिवजयंती निमित्त चित्रकला, व्याख्याने, शिवरुपसज्जा स्पर्धेचे आयोजन केले होते.

सकाळी अकरा वाजता शिवजन्मउत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वालचंदनगर परीसरातील महिलांनी गर्दी केली होती. यावेळी पंचायत समिती सदस्या शैला फडतरे, वालचंदनगरच्या सरपंच छाया मोरे,कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे यांच्या उपस्थितीत शिवजन्मउत्सव सोहळ्याचा कार्य्रकम पार पडला. दुपारी चार वाजता शिखर शिंगणापूरहुन आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करुन वाजत गाजत मिरवणूकीला सुरवात केली.

मिरवणूकीमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग घेतला. पांरपारिक पद्धतीने वेषभूषा केलेले युवक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी सहा वाजता लहान मुलांसाठी शिवरुप सज्जा कार्यक्रम झाला. यामध्ये १२ मुलांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी सात वाजता वालचंदनगर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर वाल्मिक शुक्ला, मनुष्यबळ विभागाचे जनरल मॅनेजर आनंद नगरकर व अे.बी.सुर्यवंशी यांच्या हस्ते येथील रुक्मिणी रामचंद मानकरी यांना जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. उत्सव मंडळाने डॉ. अरविंद आसबे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. चित्रकला स्पर्धेमध्ये तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तसेच नृत्य स्पर्धेमध्ये ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.  कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र रणमोडे,  संतोष गायकवाड, विनायक जमदाडे, हरीष व्यहवारे, नितीन जाधव, शिवराज पाटील,प्रकाश बर्गे, संदीप फाळके, महेश लावंड, राजू काळे, तानाजी साळुंके,नितीन जाधव,अमित कणसे,बलभिम काटे, उमेश अंबिके, राजू पेंडावळे,चंदन सिंग यांनी नियोजन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com