वालचंदनगर - लासुर्णेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Walchandnagar
Walchandnagar

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता.इंदापूर) येथे शिवजयंती उत्साहातमध्ये साजरी करण्यात आली. येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार दत्तात्रेय भरणे व पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अपर्ण करण्यात  आला.

यावेळी उद्योजक अर्जुन देसाई, पंचायत समिती सदस्य अॅड.हेमंत नरुटे, डाॅ.योगेश पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमोल पाटील,सर्जेराव जामदार, लासुर्णेच्या सरंपच निर्मला अनिल चव्हाण, उपसरपंच सुहास भोसले, भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे, विजय निंबाळकर, नेताजी लोंढे, संजय निंबाळकर, राजेशकुमार खरात, अरुण कदम, डाॅ.महादेव मोहिते उपस्थित होते.

यावेळी आमदार भरणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य जनतेचे राजे होते. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आजच्या तरुण पिढीने छत्रपतीच्या कार्याचा आदर्श घेण्याची गरज आहे.  तसेच सार्वजनिक उत्सव मंडळानी समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध साामजिक उपक्रम राबवविण्याचे आवाहन केले. यावेळी प्रवीण माने यांनी सांगितले की, तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेवून समाजाच्या प्रगतीची कामे करावीत. कार्यक्रमाच्या ठिकाणी पेवींग ब्लाॅक व इतर कामांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन १५ लाख रुपयांचा निधी देण्याची आश्‍वासन माने यांनी दिले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com