पुणे : पैशाच्या वादातून आंबी शिवारात तरुणाचा खून

crime
crime

तळेगाव स्टेशन : पैशाच्या वादातून दुचाकीने धडक देऊन,डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री तळेगावात एमआयडीसी रस्त्यावरील आंबी (ता. मावळ) गावच्या हद्दीत घडली.

विनोद सुरेश गायकवाड (२७,कामशेत,मावळ,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी अरविंद गौतम निकाळजे (२७,भीमनगर,कामशेत,मावळ,पुणे) याने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या  फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी शशिकांत भरत शिंदे (२८, रा.तळेगाव दाभाडे,मावळ,पुणे) आणि दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मौजे आंबी गावच्या हद्दीत एमआयडीसी रस्त्यावर काळोखे आर एम सी प्लॅन्टचे पुढे फिर्यादी आणि विनोद ड्यूट गाडीवरून जात असताना, फिर्यादीच्या आत्याचा मुलगा आरोपी शशिकांत शिंदे आणि साथीदारांनी पैशाच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून चिडून मागून येऊन जाणून बुजून त्याच्याकडील स्प्लेंडरने, ड्युट गाडीस पाठीमागून ठोस दिली.

विनोद गाडीवरून खाली पडल्यानंतर शशिकांतने त्यांच्या कडील स्प्लेंडर मोटारसायकल विनोदचे अंगावर चार ते पाच वेळी घालून त्यानंतर तेथे पडलेला दगड उचलून डोक्यात जोरात मारून खून केला.तिकडून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीकडून एमआयडीसी पोलिसांना फोनवरुन घटनेची माहिती मिळताच,उपनिरीक्षक विक्रम पासलकर आणि सहकाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com