जुनी सांगवीत दत्तजयंती सप्ताह व संगीत महोत्सवाचे आयोजन

datta
datta

सांगवी (जुनी) : सालाबाद प्रमाणे याही वर्षी प.पु. बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित दत्त आश्रम जुनी सांगवी आयोजित दत्त नाम सप्ताह व संगीत महोत्सवास रविवार ता.२६ पासून सुरूवात होत आहे. रविवार ता.२६ पासून रविवार ता.३ डिसें.पर्यंत चालणा-या या सप्ताहात प्रख्यात शास्त्रीय गायक वादक व किर्तनकार आपली संगीत सेवा सादर करणार आहेत. या संगीत महोत्सव व दत्तनाम जयंती उत्सवाचे उद्घाटन दिल्ली घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक पंडीत श्री उमेश मोघे यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित श्री मुकुंद मराठे यांच्या हस्ते या महोत्सवाचे दिपप्रज्वलन होणार आहे. 

यावेळी पं.राजकुमार बार्शीकर, सांगवी कलाश्री संगीत मंडळाचे पं.सुधाकर चव्हाण, राजन भाऊ शितोळे,नितिन भाऊ शितोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्रीच्या भक्तिसंगीत सत्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मुकुंद मराठे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. सोमवार ता.२७ संगीत पुष्पाच्या प्रथम सत्रात शास्त्रीय गायिका कु.आराधना हेगडे यांचे शास्त्रीय गायन होईल. तर रात्रीच्या भक्तिसंगीत सत्रात प्रख्यात शास्त्रीय गायिका पं.सौ.रेवा नातु यांचे शास्त्रीय गायन होईल. मंगळवार ता.२८ला प्रथम सत्राची सुरूवात शास्त्रीय गायक पं. नामदेव राजगुरू यांच्या शास्त्रीय गायनाने होऊन रात्रीच्या भक्तिसंगीत सत्रात प्रख्यात शास्त्रीय गायक पं.जयतिर्थ मेवंडी यांचे शास्रीय गायन होईल.बुधवार ता.२९ शास्त्रीय गायक पं.संतोष देशमुख यांच्या शास्त्रीय गायनाने प्रथम सत्रातील भक्तिसंगीताची सुरूवात होईल. तर रात्रीच्या भक्तिसंगीत सेवेत पं. शरद करमरकर यांचे शास्त्रीय गायन होईल. 

गुरूवार ता.३० प्रथम सत्राची सुरूवात शास्त्रीय गायक पं.रामेश्वर डांगे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल तर रात्रीच्या सत्रात प्रख्यात शास्त्रीय भक्तिसंगीत गायिका सु. श्री.अनुराधा कुबेर यांचे गायन होईल.शुक्रवार ता.१ शास्त्रीय व भक्तिसंगित गायिका पं.शुभांगीताई,जोशी यांच्या गायनाने प्रथम संगीत सत्राची सुरूवात होईल. तर रात्रीच्या भक्तिसंगीत सत्रात भक्तिसंगित व शास्त्रीय गायिका पं.मंजिरीताई आवेगावकर (कर्वे) यांचे गायन होईल. शनिवार ता.२ प्रथम सत्रात पं.राजकुमार बार्शीकर यांच्या शिष्य परिवारांचे गायन होईल तर रात्रीच्या द्वितीय पं.राजकुमार बार्शीकर यांते शास्त्रीय गायन व भक्ति संगीत होईल. रविवार ता.३ डिसें.सकाळी श्रींच्या पादुकांचा अभिषेक व शहनाई वादक श्री महादेव तुपे व सहका-यांचे शहनाई वादन तर प्रसिद्ध चौघडा वादक जयंत नगरकर यांचे चौघडा वादन होईल. याचबरोबर प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.माधव महाराज इंगोले यांचे दत्त जन्मोत्सवाचे किर्तन होईल. समारोपाच्या सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्रीमती स्नप्ना दातार यांचे व्हायोलिन वादन तर संगीत महोत्सवाच्या समारोपाच्या शेवटच्या सत्रात प्रख्यात बासरीवादक पं.केशवराव गिंडे यांच्या बासरीवादनाने संगीत महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवा दरम्यान ह.भ.प.मधुसुदन महाराज,माधवराव ईंगोले, संत कमंडलानंद,संत लवदास महाराज,आदी किर्तनकार या महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com