थोरातवाडीमध्ये सरपंच काँग्रेसचा तर उपसरपंच राष्ट्रवादीचा

Thoratwadi
Thoratwadi

वालचंदनगर : थोरातवाडी (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शैलजा महेश पवार यांनी एक मतांनी बाजी मारून विजय मिळवला. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या अमोल तनपुरे यांच्यावर मात्र एका मताने पराभव होण्याची वेळ आली. 

ऑक्टोबर महिन्यामध्ये येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या होत्या. सात ग्रामपंचायत सदस्य व एक सरपंच असे आठ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. पंचवार्षिक निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडल्यामुळे सरपंचपदासाठी चुरशीची तिरंगी लढत झाली. यामध्ये काँग्रेसच्या एका गटाच्या राणी अमोल थोरात यांनी बाजी मारुन सरपंचपदाच्या निवडणूकीमध्ये विजय मिळवला. उपसरपंचपदासाठी आज निवडणूक पार पडली. काँग्रेसचे असलेल्या दोन गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसने फायदा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकमेव उमेदवार नूतन संतोष नगरे होत्या. नगरेंच्या मतावर उपसरपंचपदाचा उमेदवार निवडणूक येणार असल्याने त्यांनी जय भवानी पॅनेलच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे मान्य केले. उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी शैलजा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला व अमोल तनपुरे यांना काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. हात वरती घेवून उघडपणे मतदान घेण्यात आले. यामध्ये एक मताने शैलजा पवार यांनी बाजी मारुन विजय मिळविला. माजी सरपंच केशव नगरे, हेमंत साळुंखे, बापूराव तनपुरे, सुनिल जाधव, सुभाष थोरात, मुरलीधर पवार, हनुमंत जाधव, संजय थोरात, आबासो किसवे, सचिन भिसे, शिवाजी पवार उपस्थित होते. मंडलधिकारी गिरीश संदीकर, तलाठी सचिन करगळ व ग्रामसेवक अजित भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com