मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - कोरेगाव भीमा येथील प्रकरणात शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (रा. शिवाजीनगर) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

पुणे - कोरेगाव भीमा येथील प्रकरणात शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (रा. शिवाजीनगर) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, न्यायालयात नियमित हजर राहण्याच्या अटीवर २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी हा आदेश दिला आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी शौर्य दिनानिमित्त वंदन करण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी कोरेगाव भीमा गावाच्या हद्दीत उसळलेल्या दंगलीत सुमारे ५ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Web Title: milind ekbote bell sanction