#MilkAgitation तीन रुपये दरवाढीची लालूच नको

Milk Agitation
Milk Agitation

सोमेश्वरनगर - तीन रूपये दरवाढीची लालूच आजीबात दाखवू नका. कर्नाटक आणि भाजपशासित गुजराथमध्ये दूधदरात अनुदान दिले जाते मग महाराष्ट्रात सरकारला काय अडचण आहे? असा सवाल शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी केला.

राज्याचे ऊस आंदोलन बारामतीतूनच पेटले तसेच दूध आंदोलनही पेटू शकते. त्यामुळे बारामतीच्या नादाला लागू नका, असा इशाराही त्यांनी दिला. करंजेपूल (ता. बारामती) येथील मुख्य चौकात नीरा-बारामती रस्त्यावर शेतकरी कृती समिती व स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूधदरासाठी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य अप्पाजी गायकवाड, दिग्विजय जगताप, डॅा. राजकुमार गायकवाड, अशोक गायकवाड, कैलास मगर, विकास केंजळे, अशोक शेंडकर, सुजित काकडे, माणिक लकडे आदी उपस्थित होते.

नायब तहसीलदार महादेव भोसले व सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनानंतर श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे जाऊन स्वयंभू शिवलिंगास दूधाचा अभिषेक करत 'सरकारला बुध्दी दे' अशी प्रार्थना करण्यात आली. शिवाजी शेंडकर, बाबु शेंडकर, महेश शेंडकर, तुषार शेंडकर यांनीही मोफत दूधवाटप केले व शिवलिंगास अभिषेक केला.

काकडे यावेळी म्हणाले की, बारामतीने राज्याच्या ऊस आंदोलनाची दिशा ठरविली होती. दूध आंदोलनातही बारामतीत खासगी व सहकारी दूधसंस्थांनी संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दिला आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही राजकीय जोडे बाजूला ठेवून सहभागी झाले आहेत. त्यामुळे सरकारने दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी वगळावा आणि प्रतिलिटर पाच रूपये सभासदांच्या खाती वर्ग करावेत. आंदोलन जाहीर झाल्यावरच प्रतिलिटर तीन रूपये वाढविण्याची घोषणा झाली. अशा प्रकारची लालूच दाखवू नका. शेतकऱ्याला पूर्ण हक्क मिळाला पाहिजे. प्रमोद काकडे यांनी, पाणी वीस रूपयांनी विकले जाते पण कष्टकरी शेतकऱ्याच्या दूधाला सोळा-सतरा रूपये भाव मिळतो हा विरोधाभास आहे, असे सांगून सरकारचा निषेध केला.

स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष कल्याण भगत, शहाजी जगताप, निंबूतचे सरपंच राजकुमार बनसोडे, दिलीप पवार, बंटी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश शेंडकर यांनी प्रास्ताविक केले तर मदन काकडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com