मनसेच्या 4, 5, 6 जानेवारीला मुलाखती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इच्छुकांच्या मुलाखती 4, 5 आणि 6 जानेवारीला जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये होणार आहेत. दरम्यान, शहरातील सर्व शाखाप्रमुख आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक कोथरूडमध्ये मोरेश्‍वर सभागृहात गुरुवारी (ता. 29) सकाळी अकरा वाजता होणार आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे त्यात इच्छुकांना मुलाखतींबाबत आणि पक्षाच्या निवडणुकीतील भूमिकेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 17-18 डिसेंबर रोजी शहरातील 14 नगरसेवकांच्या प्रभागातील तब्बल 51 विकासकामांचे उद्‌घाटन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करून प्रचाराचा धडाका लावला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इच्छुकांच्या मुलाखती 4, 5 आणि 6 जानेवारीला जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये होणार आहेत. दरम्यान, शहरातील सर्व शाखाप्रमुख आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक कोथरूडमध्ये मोरेश्‍वर सभागृहात गुरुवारी (ता. 29) सकाळी अकरा वाजता होणार आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे त्यात इच्छुकांना मुलाखतींबाबत आणि पक्षाच्या निवडणुकीतील भूमिकेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 17-18 डिसेंबर रोजी शहरातील 14 नगरसेवकांच्या प्रभागातील तब्बल 51 विकासकामांचे उद्‌घाटन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करून प्रचाराचा धडाका लावला आहे. तसेच चार जनसंपर्क कार्यालयांचेही उद्‌घाटन झाले आहे. आघाड्या, सेल यांनाही अधिक सक्रिय करण्याचा मुद्दा या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर असल्याचे मनसेचे शहर प्रमुख हेमंत संभूस, अजय शिंदे यांनी नमूद केले. 

"वॉर रूम'चे रविवारी उद्‌घाटन 
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भांडारकर रस्त्यावर मनसेने तात्पुरते निवडणूक कार्यालय थाटले आहे. तेथून प्रशासकीय बाबींचे नियोजन होणार असले, तरी "वॉर रूम'च्या धर्तीवर कामकाज चालेल. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 1 किंवा 2 जानेवारी रोजी उद्‌घाटन होईल. महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी ही वॉर रूम महत्त्वाची असेल, असेही शहर प्रमुख हेमंत संभूस यांनी नमूद केले.