बॅंकेत ठेवले बनावट सोने तारण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - बनावट सोने बॅंकेत तारण ठेवून काढलेले सुमारे तीन लाख रुपयांचे कर्ज न फेडून फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला शुक्रवार (ता. 23) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पुणे - बनावट सोने बॅंकेत तारण ठेवून काढलेले सुमारे तीन लाख रुपयांचे कर्ज न फेडून फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला शुक्रवार (ता. 23) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सुधीर बी. डहाळे (रा. यशवंत प्लाझा, वडगाव शेरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. अशरफ आयुब खान (वय 23, रा. मुकबिल अपार्टमेंट, मिठानगर, कोंढवा) याचा पोलिस शोध घेत आहे. या प्रकरणी डीसीबी बॅंकेच्या ढोले पाटील रस्ता येथील शाखेचे व्यवस्थापक दिनकर शेनॉय यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा गुन्हा जानेवारी 2013 ते जून 2014 या कालावधीत घडला. या बॅंकेतून सोने तारण ठेवून गृह कर्ज, मालमत्ता गहाण ठेवून वाहन खरेदीकरिता कर्ज दिले जाते. बॅंकेत तारण म्हणून ठेवल्या जाणाऱ्या सोन्याचे मूल्यांकन करण्याचे काम डहाळे यांच्याकडे होते. आरोपी खानने बॅंकेत सव्वातीन लाख रुपये किमतीचे सोने गहाण ठेवले. याचे मूल्यांकन डहाळे यांनी केले होते. या सोन्याच्या आधारे खानने 2 लाख 97 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याने या कर्जाचे हप्ते बॅंकेत भरलेच नाही. त्यामुळे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली तेव्हा तो घर सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली होती.
बॅंकेच्या नियमानुसार कर्ज वसुलीकरिता सोने लिलावात विक्री करण्याची कार्यवाही बॅंकेने सुरू केली. या सोन्याची पडताळणी अविनाश स्वामी या सराफाने करून घेतल्यानंतर 10 अंगठ्या बनावट सोन्याच्या असल्याची माहिती पुढे आली होती. पोलिसांनी डहाळेला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणी 2014 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर डहाळे हा पसार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

पुणे

पुणे - ‘‘श्रेया आज २३ वर्षांची झाली आहे. ती जाणून आहे, की आम्ही तिला दत्तक घेतले आहे. तिच्याशी जोडलेला बंध हा रक्‍ताच्या...

06.06 AM

पुणे - गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा होत असून, त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी महापालिकेतर्फे रविवारी सकाळी दुचाकी रॅली...

05.48 AM

पुणे - एकीकडे आधार कार्डातील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असताना, दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्या माहिती...

05.33 AM