आर्याने जाणून घेतले अंधविश्‍व

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

भोसरीतील लुंकड शाळेस भेट देऊन केला नेत्रदानाचा संकल्प

मोशी - अंधांच्या वेदना समजून घेत आपणही मृत्यूनंतर नेत्रदान करणार असल्याचा संकल्प बालकलाकार आर्या घारे हिने केला. निमित्त होते भोसरी येथील पताशीबाई रतनचंद लुंकड अंधशाळेतील अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला भेटीचे. आर्याने आपला वाढदिवसही तेथे साजरा केला. त्यांचा दिनक्रमही जवळून पाहिला. 

दृष्टी नसल्याने दिवसभरामध्ये विविध अडचणींना तोंड देत ही अंध मुले आपली सर्व कामे कशी करतात, विविध खेळ कसे खेळतात, ब्रेल लिपीच्या माध्यमातून अभ्यास कसा करतात, याचे निरीक्षण केले. त्यातून माणसाला दृष्टी असणे किती अत्यावश्‍यक आहे, हे तिच्या बालमनाला उमगले आणि त्याच वेळी ठरविले, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा संकल्प केला व काळा चष्मा लावून त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला. 

अंध विद्यार्थ्यांना सरकारकडून विविध स्तरांवर मदत व रोजगार मिळावा, तसेच दृष्टी मिळण्यासाठी प्रत्येकाने नेत्रदान करावे, असे आवाहन करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्याचा मनोदय या वेळी आर्याने बोलून दाखविला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन खंडागळे, उपमुख्याध्यापक पांडुरंग साळुंखे, प्रशासनाधिकारी संभाजी भांगरे, व्यवस्थापक राजू वाडेकर, अधीक्षक दत्तात्रेय कांबळे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शांतिलाल लुंकड, उपाध्यक्ष पुष्पा लुंकड यांनी नेत्रदानाच्या निर्णयाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.

विविध संस्थांचे पदाधिकारी या शाळेत येऊन आपला वाढदिवस साजरा करतात. येथील विद्यार्थ्यांना विविध वस्तू भेट देतात. मात्र, आर्याने नेत्रहीन विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून नेत्रदानाचा संकल्प केला, ही अद्वितीय भेट आहे.
- किसन खंडागळे, मुख्याध्यापक, पताशीबाई लुंकड अंधशाळा, भोसरी