'संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

पुणे - ""डेक्कन येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण झालेच पाहिजे. प्रशासनाला सांगून हे काम वेळेत हाती घ्यावे. जर प्रशासन ऐकत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही प्रशासनाला सरळ करू. उपोषणाला बसायचे असेल तर त्यासाठी येथे येऊ,'' अशी भूमिका खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी घेतली. 

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड आयोजित दुचाकी रॅलीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, कर्नल सुभाष पोळ, रणजित शिरोळे, प्रशांत धुमाळ, विराज तावरे, कैलास वडगुले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपतींच्या पुतळ्यास बुधभूषण ग्रंथाच्या प्रतींचा हार अर्पण करण्यात आला. पुतळ्यापासून निघालेली दुचाकी रॅली किल्ले पुरंदरकडे रवाना झाली. रॅलीचे यंदा सोळावे वर्ष होते. 

संभाजीराजे म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही कर्तृत्ववान राजे होते. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोचले पाहिजे. संस्कृतमध्ये "बुधभूषण' ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज यांचेही कार्य प्रेरणादायी आहे.'' प्रशासनाला सांगून सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्‍वासन महापौर टिळक यांनी या वेळी दिले. 

पासलकर म्हणाले, ""बुधभूषण', "नखशिखांत, "सातसतक', "नायिकाभेद' हे ग्रंथ वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजीराजे यांनी लिहिले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना सहा भाषा अवगत होत्या. त्यांची जयंती हा लोकोत्सव व्हावा.''

Web Title: MP Chhatrapati Shivaji Sambhaji Raje's demand