मयताच्या नातेवाईकाना मदत द्या, महावितरणविरोधात काँग्रेसचा मोर्चा

रविंद्र खरात 
सोमवार, 31 जुलै 2017

दोषी अधिकारी वर कारवाई करा. काँग्रेसची मागणी 

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये ऐन पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत होणे, वीज बिल वाढ़ीव येणे यामुळे नागरीक त्रस्त असताना 27 जुलै रोजी मुख्य वीजवाहक तार अंगावर पडल्याने दुर्दवी मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ आज (सोमवार) महावितरणच्या मुख्य कार्यालय तेजश्रीवर काँग्रेसच्या वतीने धड़क मोर्चा काढत निषेध व्यक्त करत मृतकांच्या नातेवाईकांना मदत आणि दोषी अधिकारीवर्गावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे . 

कल्याण पूर्वमध्ये महावितरणच्या कारभारामुळे नागरीक त्रस्त आहेत, एकीकडे बत्ती गुल आणि वाढते वीज बिलांची संख्या वाढत असल्याने नागरीकामध्ये संतापाचे वातावरण आहे, दरम्यान कल्याण पूर्व मध्ये 27 जुलै रोजी सायंकाळी  श्रीराम टॉकीज जवळ विजवाहक मुख्यतार अंगावर पडून विजेचा धक्का लागल्याने नितीश शाहू या 22वर्षीय बॅग कामगाराचा मृत्यू झाला. मुख्य तारांचे शॉर्टसर्किट होत असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती मात्र महावितरणचे अधिकारी सदर दुरुस्ती करण्यासाठी आलेच नसल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी शैलेश तिवारी यांनी केला आहे.

या घटनेच्या निषेध करण्यासाठी कल्याण पूर्व मधून आज  सोमवार ता 31 जुलै रोजी धड़क मोर्चा काढण्यात आला होता, श्रीराम टॉकीज चौक खडगोळवली येथून सुरू झालेला हा मोर्चा  विठ्ठलवाडी स्टेशन मार्गे आनंद दिघे उड्डाणपूल, वालधुनी ब्रिज, बाईचा पुतळा मार्गे कर्णिक रोड येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धड़क मोर्चा काढण्यात आला होता . यात बॅग कामगारानी ही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती . आज कल्याण मध्ये काँग्रेस पक्षातर्फे ह्या मोर्चाचे नेतृत्व माजी लोकसभा अध्यक्ष शैलेश तिवारी, ब्रिज दत्त, महिला जिहाध्यक्षा कांचन  कुलकर्णी,कल्याण पूर्व विधानसभा उपाध्यक्ष राहुल काटकर,महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सीमा खान आदीनी सहभाग घेतला .

महावितरण  विभागातील कार्यकारी अभियंता हे नितीश शाहू  या युवकाच्या  मृत्यूस कारणीभूत असून  त्यांच्या बेजवाबदारीमुळे ही घटना घडली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मयताच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी तेजश्री या महावितरण च्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता आणि अधिकारी वर्गाने आश्वासन दिले आहे अशी माहिती काँग्रेस पदाधिकारी शैलेश तिवारी यांनी दिली . 

काँग्रेस पदाधिकारीचा मोर्चा होता, संबधित घटनेची चौकशी सुरु असून अहवाल प्राप्त होताच दोषीवर कारवाई केली जाईल आणि शासनधोरण नुसार मयताच्या नातेवाईकाना मदत दिली जाईल अशी माहिती महावितरण कल्याण परिमंडळ उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.