प्रभागरचनेसंबंधी हरकती पाठवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

पुणे - महापालिका निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षणाबाबत येत्या १० ते १५ ऑक्‍टोबर या कालावधीत हरकती आणि सूचना नागरिकांना घेता येणार आहेत. त्यासंबंधी महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवर दखल घेतली जाणार आहे. यासंदर्भात येत्या २२ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाकडे अंतिम सुनावणी होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. 

महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, सावरकर भवनमध्ये निवडणूक कार्यालयात आणि महापालिकेच्या सर्व म्हणजे १५ क्षेत्रीय कार्यालयांत लेखी स्वरूपात हरकती आणि सूचना स्वीकाल्या जातील, असेही आयुक्तांनी सांगितले. 
 
पुढील प्रक्रिया 
हरकती व सूचना - १० ते २५ ऑक्‍टोबर 
हरकती व सूचनांवर सुनावणी (महापालिका) - 
४ नोव्हेंबर
सुनावणीदरम्यानच्या शिफारशी निवडणूक आयोगाकडे देणार- १० नोव्हेंबर 
हरकती-सूचनांचा विचार करून निर्णय देणे (निवडणूक आयोग)- २२ नोव्हेंबर 
अंतिम प्रभागरचना जाहीर होणार -२५ नोव्हेंबर