पत्नीचा खून करणारा जेरबंद

यवत (ता. दौंड) - आ रोपीसह पोलिस अधिकारी व तपास करणारे पोलिस पथक.
यवत (ता. दौंड) - आ रोपीसह पोलिस अधिकारी व तपास करणारे पोलिस पथक.

यवत - केडगाव चौफुला येथे पत्नीचा खून करून पळालेल्या राजकुमार कुसवाह (मूळ रा. सुखलालनगर, बिहार, सध्या रा. केडगाव चौफुला) यास यवतचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या पथकाने नाशिक येथे जाऊन चोवीस तासांच्या आत जेरबंद केले. पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी ही माहिती दिली.

बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी धायगुडे वाडी- बोरीपार्धी हद्दीत एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिस पाटील अविनाश शेंडगे यांनी दिली. त्यानुसार यवत पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, ती याच परिसरातील एका पोकलेन चालकाची पत्नी असल्याचे समजले. त्याच वेळी तिचा पती गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांना शंका आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृत महिलेचा पती राजकुमार यास शोधण्यास सुरवात केली व त्याला पकडण्यात यश मिळाले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी राजकुमार कुसवाह याने कबुली दिली, की पत्नी सोनी हिचे एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. या रागामुळे आपण तिच्या पाठीत वार करून मृतदेह विहिरीत टाकला. दोघांचा विवाह आठ महिन्यांपूर्वीच झाला होता. 

यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱ्या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे, गणेश पोटे, दीपक पालके, अभिजित कांबळे, महेश बनकर, गणेश झरेकर, विनोद रासकर, विशाल गजरे, संपत खबाले, नारायण सोमवंशी यांचा समावेश होता.

अशी केली आरोपीला अटक
सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी फोनवरून डॉक्‍टर बोलतो असे सांगून आरोपीस कुठे आहेस अशी विचारणा केली. त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येऊ लागली; परंतु त्याचवेळी पोलिसांनी तो कुठून बोलतो याचा शोध सुरू ठेवला. या जाळ्यात तो बरोबर अडकला. त्याला नाशिक येथून बुधवारी रात्री ताब्यात घेतले. यवत पोलिसांना सायबर सेल पुण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com