मावळातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ

maval
maval

टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना भुरळ पाडली आहे. वीकेंड वगळता सध्या इतर दिवशी देखील पर्यटकांची वाहने आंदर मावळातील वडेश्वर खांडी आणि भोयरे सावळा रस्त्यावर धावू लागली आहे. 

सह्याद्रीच्या कडेपठारावरून फेसाळत वाहणारे धबधबे पाहत आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत पर्यटक आंदर मावळाची रपेट घडवित आहे. १७ नंबर हा या पर्यटनातील आवडता व लोकप्रिय होऊ घातलेला शब्द पुढे येत आहे. १७ नंबर वरून कर्जत तालुक्यातील विहंगम रूप न्याहाळता येते. येथे पायथ्याला असलेला टाटा पॉवरचा वीजनिर्मिती प्रकल्प दूरवरून पाहता येतो, पण निसर्गाशी साथसंगत करायला कुटुंबवत्सल परिवार शनिवार रविवार टाळून येते आहे. वर्षा विहाराच्या पर्यटनातून रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत. पूर्वी रस्त्याच्या लगत असलेली चहा नाष्टाची हॉटेल्स सुरू आहेतच, या शिवाय भोयरे, माऊ, डाहूली, बेंदेवाडीत घरगुती खानावळी सुरू झाल्या आहेत. धबधब्याच्या लगत कोणी मक्याची कणसे, भुईमूगाच्या शेंगा, वाफळलेला चहा, गरमागरम चहा, वडापाव, भजी विकत आहे.शाहाकारी खव्याच्या साठी पिठले भाकरी, ठेचा असा मेनू असून, मांसाहारी खव्यांना तांबड्या रस्सावर ताव मारता येतो. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. 

काही अतिहौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीने स्थानिक त्रस्त होत आहे. त्यांच्यावर पोलिसी कारवाई होणे गरजेचे आहे. अरूंद आणि वळणाच्या रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या तरुणांनी वाहने सावकाश चालवावी असा सबुरीचा सल्ला दिला जातो. अरुंद रस्ते रूंद होण्याची गरज असून पर्यटकांच्या वाढीसाठी कृषीपर्यटक केंद्र उभी राहिली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com