...तर "घड्याळा'चा गजर झाला असता 

सागर शिंगटे - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये "भाजप'ने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे "घड्याळ' बंद पाडले; परंतु सत्तेच्या लढाईत "राष्ट्रवादी'च्या तब्बल 57 उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापैकी, निम्म्या जागांवर जरी "राष्ट्रवादी'चे उमेदवार विजयी झाले असते, तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते. जवळपास 92 जागांवर "राष्ट्रवादी'च्या "घड्याळा'चा गजर झाल्याचे दिसून आले असते. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपने "कमळ' फुलविण्यात यश मिळविले; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणखी ताकद लावली असती तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. राष्ट्रवादीच्या तब्बल 57 उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापैकी, निम्म्या जागा मिळाल्या असत्या तरी "राष्ट्रवादी' सत्ता स्पर्धेत राहिली असती. 

महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज आजी-माजी नगरसेवक वसंत लोंढे, उल्हास शेट्टी, भाऊसाहेब भोईर, नारायण बहिरवाडे, शमीम पठाण, तानाजी खाडे, गुरुबक्ष पहलानी, कैलास थोपटे, संजय वाबळे, शोभा आदियाल, सुषमा तनपुरे, स्वाती साने, मंदा आल्हाट, आशा सूर्यवंशी, जालिंदर शिंदे, आशा सुपे, विमल काळे, अनिता तापकीर, राजेंद्र साळुंके आदींना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 

याखेरीज, पॅनेलचा विचार करता भाजपच्या तडाख्यात प्रभाग क्र.4, प्रभाग क्र.7, प्रभाग क्र. 17, प्रभाग क्र.19 येथील राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनेलच गारद झाले; परंतु तेथील उमेदवार द्वितीय क्रमांकावर राहिले; तर प्रभाग क्र.4, प्रभाग क्र.8, प्रभाग क्र.10, प्रभाग क्र.29, प्रभाग क्र.31 आणि प्रभाग क्र.32 येथे "राष्ट्रवादी'च्या पॅनेलच्या तीन उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. जवळपास 5 प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. 

पुणे

टाकवे बुद्रुक : कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज भरायला सायबर कॅफेत रांग लागत आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करायला...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

जुन्नर : शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना 'भीक नको पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे कृषीनिष्ठ शेतकरी...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017