बाजारात तुरी अन्‌ महापौरपदाची स्वप्ने...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - अजून उमेदवारांचा पत्ता नाही, कुणासमोर कोण उभे राहणार, हे धड निश्‍चित नाही. त्यामुळे बाजारात तुरी अशी परिस्थिती असतानाही आपलेच समर्थक मोठ्या संख्येने निवडून यावेत, यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही उत्साही नेते प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रतिस्पर्धी नेत्यांच्या समर्थकांची नावे कापण्याचे जोरदार प्रयत्नही सुरू असल्याचे दिसून येते. 

आपलाच पक्ष सत्तेत येणार, अशी दिवास्वप्ने भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही अनेकांना पडू लागली असून, त्या दोन्ही पक्षांतील अनेकांनी महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आदी पदांच्या आशेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. पक्षाकडून उमेदवारी निश्‍चित करण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची निश्‍चिती अजून झालेली नाही आणि कोणत्या जागेवर कोणाचा सामना कोणाशी होणार, हे ठरलेले नाही. तरीही ‘आमचाच पक्ष सत्तेत येणार’, अशी स्वप्ने भाजपच्या इच्छुकांना पडत आहेत आणि त्यातून गटबाजी उफाळून आली आहे. अनेक स्थानिक नेत्यांनी रणनीती आखून आपल्या जास्तीत जास्त समर्थकांना उमेदवारी कशी मिळेल, या दृष्टीने प्रयत्न केले.

महापालिका निवडणुकीआधी महापौर पदाची सोडत निघते. गेली काही वर्षे या पदावर महिलांचे आरक्षण होते. यंदा मात्र या पदासाठी खुला गट किंवा मागासवर्गीय गटाचे आरक्षण पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पक्षातील काही ज्येष्ठ माननीय या पदांसाठी इच्छुक झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील हेच चित्र आहे. 

भाजपकडे सध्या इच्छुकांचा मोठा ओढा आहे. उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याने नेतेमंडळी एकमेकांच्या समर्थकांना कापण्याच्या तयारीत आहेत. त्यातून काही ज्येष्ठांना अन्य प्रभागांतून निवडणुका लढविण्यासाठी सांगितले जात आहे; परंतु त्यांची मनःस्थिती नाही. त्यामागेदेखील महापौरपद हे एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळेच ताई, भाऊ आणि अण्णा सध्या ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. मात्र, ज्येष्ठांच्या या आग्रहामुळे पक्षाला काही प्रभागातील उमेदवारी निश्‍चित करताना अडचणी येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३ फेब्रुवारी आहे. त्या आधीच महापौरपदाचे आरक्षण  पडण्याची एक शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

Web Title: NCP dreams with bjp