युतीच्या पराभवासाठी आघाडी हवी- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

शिवसेना व भाजप यांच्या युतीवर आघाडीचा निर्णय अवलंबून नाही. काँग्रससोबत आघाडीसाठी आम्ही अनुकूल आहोत. पुण्यात आघाडीसाठी चर्चा सुरु असून, येत्या दोन दिवसांत आघाडीबाबत निर्णय होईल.

पुणे - आगामी निवडणुकीत शिवसेना व भाजप युतीचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र आले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे, माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

आगामी दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अद्याप युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय झालेला नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्याप युतीबाबत चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आघाडीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की शिवसेना व भाजप यांच्या युतीवर आघाडीचा निर्णय अवलंबून नाही. काँग्रससोबत आघाडीसाठी आम्ही अनुकूल आहोत. पुण्यात आघाडीसाठी चर्चा सुरु असून, येत्या दोन दिवसांत आघाडीबाबत निर्णय होईल. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल. भाजपमध्ये गेलेल्यांना पश्चाताप होतोय, काही परत आले, काही येतील. भाजप व शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकत्र आले पाहिजे ही आमची भुमिका आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादला एकत्र असताना माझी आणि अशोक चव्हाण यांची याबाबत चर्चा झाली होती. आम्ही आघाडीचे अधिकार शहर अध्यक्षांना दिले आहेत. दोघांचाही सन्मान राखला जाईल अशा प्रकारे आघाडी करण्याची आमची तयारी आहे.

पुणे

औंध : औंधरस्ता येथील पडळवस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाल्याने सर्वच कुटूंबे उघड्यावर पडली आहेत...

12.45 PM

तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे...

04.48 AM

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM